पूर्ववैमनस्यातून पतीला जीवे मारण्याची व मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:45 PM2019-12-27T15:45:07+5:302019-12-27T15:45:50+5:30
तुझ्या पतीला मारून टाकीन, तुझे घर उद्ध्वस्त करून टाकीन..
पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून पतीला मारून टाकण्याची व मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी दिली. तसेच घरातील टीपॉयची काच फोडून शिवीगाळ केली. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे गुरुवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सुरेखा भास्कर गायकवाड (वय 48, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सस्या ऊर्फ राजू वाघमारे, तोपान सिध्वराम माडेकर व अक्षय (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी सुरेखा गायकवाड राहत्या घरी असताना घरात येऊन जुन्या भांडणाचा राम मनात धरून आरोपी दांडके घेऊन गायकवाड यांच्या घरात आले.तुझ्या पतीला मारून टाकीन, तुझे घर उद्ध्वस्त करून टाकीन, अशी धमकी फिर्यादीस दिली. तुला कशी गायब करतो, अशी धमकी गायकवाड यांच्या मुलीलाही दिली. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्याने टीपॉयची काच फोडून शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.