अत्याचार करून पोलिसांकडे तक्रार न देण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:45 AM2018-12-28T01:45:25+5:302018-12-28T01:45:33+5:30

फिर्यादी यांचा नातेवाईक असलेला एकजण रुपीनगर, तळवडे येथील त्यांच्या घरी आला.

Threatened police threatened not to complain | अत्याचार करून पोलिसांकडे तक्रार न देण्याची धमकी

अत्याचार करून पोलिसांकडे तक्रार न देण्याची धमकी

Next

पिंपरी : फिर्यादी यांचा नातेवाईक असलेला एकजण रुपीनगर, तळवडे येथील त्यांच्या घरी आला. फिर्यादीच्या मूकबधिर मुलीचा विनयभंग करून त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांना सांगितला, तर तुमचे काही खरे नाही, अशी धमकी दिली. चिखली पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटकही झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी नातेवाईक आहेत. रुपीनगर, तळवडे येथे आरोपीने मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. विनयभंग केल्यानंतर हा प्रकार कोणालाही सांगू नका. पोलिसांकडे तक्रार देऊ नका. पोलिसांकडे तक्रार दिली, तर तुमचे काही खरे नाही, अशी धमकी आरोपीने मुलीच्या कुटुंबीयांना दिली आहे.
दरम्यान ओटा स्कीम, निगडी येथील तरुणीने विनयभंग झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केलेली आहे. सागर जाधव (रमाईनगर, ओटा स्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची बहीण घरी असताना, आरोपी फिर्यादीच्या घरात गेला. मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.

Web Title: Threatened police threatened not to complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.