व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने मित्रासोबतही ठेवायला लावले शारीरिक संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 20:31 IST2021-09-26T20:29:13+5:302021-09-26T20:31:24+5:30
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; एकाला अटक

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने मित्रासोबतही ठेवायला लावले शारीरिक संबंध
नवी मुंबई : दहा वर्षांपासून प्रेम संबंध असलेल्या तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रासोबत देखील संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसांनी एकाला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दिघा परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. त्याच परिसरातील हरिओम डडवाल याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मागील दहा वर्ष प्रेमसंबंध ठेवले होते. मात्र काही वर्षांपासून ती लग्नाचा तगादा लावत असल्याने तो तिला नकार देत होता. अखेर त्याने गतवर्षी तिला लग्नाला होकार देत त्याच्याच एका मित्रासोबत शरीरसंबंध करण्यास सांगितले. यानुसार तो तिला व त्या मित्राला घेऊन एका ठिकाणी गेला असता त्याठिकाणी तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढण्यात आले. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो मागील एक वर्षांपासून तो तिचे लैंगिक शोषण करत होता. तसेच तिची जात तुच्छ असल्याचे उद्गार वारंवार काढून तिला अपमानित करत होता. यादरम्यान त्याने अनेकदा तिला मारहाण केल्याचा देखील तरुणीचा आरोप आहे. अखेर त्याच्या त्रासाला त्रस्त झालेल्या तरुणीने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याद्वारे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हरिओम डडवाल याला अटक केली आहे. तर त्याच्या मित्राच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.