मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार यांना धमकीचे फोन; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By वैभव गायकर | Published: September 5, 2022 02:15 PM2022-09-05T14:15:38+5:302022-09-05T14:22:04+5:30
सोनार यांनी महिला सेनेच्या रायगड जल्हाध्यक्षाची दुरा हाती घेतल्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत.
पनवेल - मनसेच्या महिला सेनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष अदिती सोनार यांना धमकीचे फोन येत असल्याने याबाबत सोनार यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे शोध सुरू केला आहे.
सोनार यांनी महिला सेनेच्या रायगड जल्हाध्यक्षाची दुरा हाती घेतल्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी प्रवास करावा लागत असतो. मात्र अशावेळी अज्ञात व्यक्ती दुचाकी वरून सोनार यांच्यावर पाळत ठेवत आहे.वारंवार अज्ञात व्यक्ती माझ्यावर पाळत ठेवत असल्याने माझ्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता देखील अदिती सोनार यांनी व्यक्त केली आहे.
सोनार या याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांची देखील भेट घेणार आहेत. ज्या मोबाईल क्रमांकावरून अदिती सोनार यांना धमक्या येत आहेत. तो मोबाईल क्रमांक देखील सोनार यांनी पनवेल शहर पोलिसांना दिला आहे.