निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 05:46 PM2019-10-17T17:46:11+5:302019-10-17T17:51:34+5:30

महिलेच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून तिच्या पतीला मारून टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली.

Threatens to acid throw on the face woman who going for election security | निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची दिली धमकी

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची दिली धमकी

Next
ठळक मुद्देपैशांचीही केली मागणी : सरकारी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात असलेल्या महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून तिच्या पतीला मारून टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे पाच लाखांची मागणी केली. पिंपरी येथे बुधवारी (दि. १६) सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सरकारी कर्मचाºयावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा शाहू चौहान (वय ३५, रा. कोंढवा) असे सरकारी कर्मचारी असलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी कर्मचारी असलेल्या ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरीतील नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होत्या. त्यावेळी इकडे ये, असे आरोपी चौहान म्हणाला. त्यालाफिर्यादीने नकार दिला. त्यामुळे आरोपी चौहान याने शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. तू माझी नाही झाली तर, तुला कोणाचीच होऊ देणार नाही, तू मला फक्त कधी एकटी भेट, तुज्या तोंडावर अ?ॅसिड फेकल्याशिवाय शांत बसणार नाही. तुज्या नवºयालासुद्धा मारून टाकेन. आपल्या दोघांचे फोटो माज्याकडे आहेत. ते मी सगळ्यांना दाखवून तुझी बदनामी करेन, तुझे जगणे अवघड करेन, अशी धमकी आरोपी चौहान याने दिली. 
तुला फोटो पाहिजे असतील तर, मला पाच लाख रुपये दे, असे म्हणून पतीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची आरोपी चौहान याने धमकी दिली. तसेच सोशल मीडियावर आरोपीने डीपीला फियार्दीचा फोटो ठेवला असल्याने फियार्दीच्या मनास लज्जा उत्पन्न करून फियार्दी महिलेचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Threatens to acid throw on the face woman who going for election security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.