रेखा जरे हत्याकांडातील बालविकास अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 06:26 AM2020-12-07T06:26:34+5:302020-12-07T06:27:05+5:30

Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

threatens the lives of child development officers | रेखा जरे हत्याकांडातील बालविकास अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका!

रेखा जरे हत्याकांडातील बालविकास अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका!

Next

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. रविवारी माने यांनी पोलिसांसमोर जबाब नोंदविला.
जरे यांची ३० नोव्हेंबरला रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत माने कारमध्ये होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. घटनेनंतर माने यांनीच जरे यांना रुग्णालयात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मी रेखा जरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात साक्षीदार असल्याने माझ्या जीवितास यातील आरोपींपासून धोका होण्याची शक्यता आहे. 
मी सरकारी साक्षीदार असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी माने यांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली आहे. हत्याकांडानंतर माने या पोलिसांच्या संपर्कात नसल्याची चर्चा होती. पोलिसांनी त्यांना सोमवारीही जबाबासाठी बोलाविले आहे. 

रेखा जरे यांची हत्या मी प्रत्यक्ष पाहिली. या घटनेनंतर माझा रक्तदाब वाढला होता. माझी आईही घाबरून गेली होती. कामानिमित्त मी दोन दिवस गावी गेले होते. मात्र, मी पोलिसांच्या संपर्कात होते. मी फरार झाल्याची चर्चा चुकीची आहे. रविवारी तपास अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविला आहे. सोमवारी पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे. 
- विजयामाला माने, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी.

Web Title: threatens the lives of child development officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.