अनैतिक संबंधांबाबत सांगण्याची धमकी; १४ महिन्यांनंतर लागला खुनाचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 12:24 PM2020-12-13T12:24:49+5:302020-12-13T12:25:40+5:30

Crime News Aurangabad: पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Threats to told immoral relationships; After 14 months got Corpses | अनैतिक संबंधांबाबत सांगण्याची धमकी; १४ महिन्यांनंतर लागला खुनाचा छडा

अनैतिक संबंधांबाबत सांगण्याची धमकी; १४ महिन्यांनंतर लागला खुनाचा छडा

googlenewsNext

कायगाव, औरंगाबाद : १४ महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या अंमळनेर येथील २९ वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने उकरून काढला. अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून, या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 


याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंमळनेर येथील तरुण गणेश दामोदर मिसाळ हा ५ ऑक्टोबर २०१९ पासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटूंबियांनी ५ दिवस सर्वत्र शोध घेऊनही गणेश सापडला नसल्याने, १० ऑक्टोबर २०१९ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. 


तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. दरम्यान,  पोलिसांनी सचिन ज्ञानेश्वर पंडित, आणि रवींद्र उर्फ पप्पू कारभारी बुट्टे (दोघेही रा.अंमळनेर, ता.गंगापूर) यांना ताब्यात घेतले. तपासात सचिन ज्ञानेश्वर पंडित याचे गावातील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि  मयत गणेश याला अनैतिक संबंधाची माहिती होती, तसेच तो हे संबंध उघड करण्याची धमकी देत होता. या कारणावरून आरोपींनी  कट रचून त्याचे अपहरण केले आणि दोरीने गळा आवळून खून केला आणि प्रेत अंमळनेर शिवारातील पांडुरंग गाडे यांच्या  शेतात पुरून टाकले होते, अशी माहिती समोर आली. 


पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोहेकॉ. कैलास निंभोरकर,  विजय भिल्ल, पोलीस नाईक संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकूटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रय गुंजाळ आदींचा या संपूर्ण कारवाईत समावेश होता. 
गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी तंत्रशुद्ध व कौशल्यपूर्ण तपास केल्याने आणि प्रकर्मचा छडा लावल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title: Threats to told immoral relationships; After 14 months got Corpses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.