देशातील अखेरच्या ‘टाडा’ खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष; बिल्डर सुरेश दुबे खून खटला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:19 AM2023-05-25T05:19:34+5:302023-05-25T05:21:15+5:30

बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

Three acquitted including Bhai Thakur in country's last 'Tada' case; Builder Suresh Dubey murder case | देशातील अखेरच्या ‘टाडा’ खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष; बिल्डर सुरेश दुबे खून खटला

देशातील अखेरच्या ‘टाडा’ खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष; बिल्डर सुरेश दुबे खून खटला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले. ‘टाडा’ कायद्यांतर्गत दाखल असलेल्या देशातील शेवटच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयाने ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जयंत ऊर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रिक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.   

बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यावेळी या सर्व परिसरात भाई ठाकूर याची दहशत होती. या प्रकरणात पोलिसांनी टाडा (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टिव्ह ॲक्टव्हिज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट) नुसार कारवाई केली होती.

शेवटचा टाडा खटला
  देशातील या शेवटच्या टाडा खटल्याची सुनावणी २००५ मध्ये सुरू झाली होती. 
  सरकार पक्षाने ८० हून अधिक साक्षीदार तपासले. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते. 
  सध्या ५ आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान दोघांचे निधन झाले. 
  त्यात भाई ठाकूर, त्याचा भाऊ दीपक ठाकूर आणि गजानन पाटील हे तीन आरोपी होते.

Web Title: Three acquitted including Bhai Thakur in country's last 'Tada' case; Builder Suresh Dubey murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.