उरणमध्ये घरफोडीत साडेतीन लाखाचे दागिने चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल
By नामदेव मोरे | Published: August 22, 2022 02:45 PM2022-08-22T14:45:12+5:302022-08-22T14:45:39+5:30
burglary : घरातील कपाटात ठेवलेली सोन्याच्या दोन अंगठी, लॉकेट,कानातले जोड, चांदीच्या साखळ्या व २२५०० रोख रक्कम असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
नवी मुंबई : उरण तालुक्यातील नागाव येथे राहणाऱ्या निलेश घरत याच्या घरामध्ये २० ऑगस्टला रात्री चोरी झाली आहे. चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटातील रोख रक्कम व दागिने असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे.
बीएमसीटी पोर्टमध्ये काम करणारा निलेशची पत्नी मुलीला घेऊन डोंगरी येथील आई - वडीलांकडे गेली होती. निलेश शनिवारी रात्रपाळीला कामावर गेला होता. रविवारी कामावरून सुट्टी झाल्यानंतर तो डोंगरीवरून पत्नी व मुलीला घेऊन घरी आला असता दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेल्या दिसला.
घरातील कपाटात ठेवलेली सोन्याच्या दोन अंगठी, लॉकेट,कानातले जोड, चांदीच्या साखळ्या व २२५०० रोख रक्कम असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उरण पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.