भिवंडीत सहा किलो गांजासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 05:28 PM2020-09-18T17:28:35+5:302020-09-18T17:29:08+5:30
तिघांना शांतीनगर पोलिसांनी गुरुवारी सापळा लावून अटक केली आहे.
भिवंडी - भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रात गुन्हे वाढत असतानाच अवैध धंद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जब्बार कंपाऊंड येथे गांजा घेऊन आलेल्या रिक्षा चालकासह आणखी दोनजण असे एकूण तिघांना शांतीनगर पोलिसांनी गुरुवारी सापळा लावून अटक केली आहे.
जब्बार कंपाऊंड येथे गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहीती शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली असता त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक भिका भवर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने जब्बार कंपाऊंड या ठिकाणी सापळा रचला असता त्याठिकाणी एक रिक्षा व त्यामध्ये दोन इसम आले असता त्यांना ताब्यात घेऊन रिक्षाची झडती घेतली असता रिक्षा मध्ये 6 किलो 128 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला असून एकूण 60 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरोधात एन डी पी एस ऍक्ट सन 1985 चे कलम 8 [ क ],20 [ ब ] ,22 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा
सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा