भाईंदरमधून १० लाखांच्या चरससह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 20:58 IST2019-01-29T20:53:03+5:302019-01-29T20:58:25+5:30
१० लाख किंमतीचा अडिज किलो चरस जप्त केला आहे.

भाईंदरमधून १० लाखांच्या चरससह तिघांना अटक
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या क्विन्स पार्क भागात नवघर पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १० लाख किंमतीचा अडिज किलो चरस जप्त केला आहे.
सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना काही इसम हे अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम भालसिंग यांना सापळा रचून कारवाईचे निर्देश दिले होते. कुलकर्णी व भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे, उपनिरीक्षक राठोड सह पाटील, राठोड, राऊत, चव्हाण, वाकडे, हतगल यांनी सेव्हन सक्वेअर शाळेजवळील मौसम बारसमोर सोमवारी सापळा रचला. त्यावेळी आलेल्या तीन संशयितांनाबद्दल खात्री पटताच त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून काश्मिरी चरसचा २ किलो ५५० ग्रॅमचा साठा जप्त करण्यात आलाय. त्याची बाजारात १० लाख २० हजार रुपये किंमत आहे. पुनीतकुमार सिंग (२२), अबरार अहमद चौधरी (२१ ) व हमुदुल्ला शेख (२३) अशी अटक आरोपींची नावे असून ते सर्व मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत. नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत.