म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार करणार तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 09:05 PM2021-06-19T21:05:41+5:302021-06-19T21:06:49+5:30
म्युकरमायकोसिस आजारावर परिणामकारक असलेल्या अॅम्फोटेरसीन - बी या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रेमडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याच्या घटना समोर येत असतांनाच आता म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजारावर परिणामकारक असलेल्या अॅम्फोटेरसीन - बी या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणण्यात आलेले १४ इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात जप्त केली आहेत. ही कारवाई कापूरबावडी पोलीस स्टेशन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निखील पवार, अमरदीप सोनावणे आणि प्रग्णोशकुमार पटेल अशी आहेत. म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) साठी उपयुक्त असलेल्या अॅम्फोटेरसीन - बी या इंजेक्शनचा मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन विक्री करणा:या दोघांची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कापूरबावडी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकासोबत कापूरबावडी येथे १४ इंजेक्शन घेऊन आलेल्या अमरदीप सोनवणो, निखिल संतोष पवार यांना अटक करण्यात आली. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून १४ इजेंक्शन ताब्यात घेतली आहेत. हे दोघेही हे इंजेक्शन प्रग्णोशकुमार पटेल याच्याकडून घेत होते अशी माहिती देखील पुढे आली असून त्याला देखील अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी अमरदीप हा मुंबई महापालिकेत क्लिनिंग मार्शल म्हणून काम करीत आहे. तर निखिल हा एका फार्मासिटिकल कंपनी मध्ये मेडिकल प्रतिनिधी असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. आरोपी काळाबाजार करीत असलेल्या इंजेक्शनची मूळ किंमत ७ हजार ८०६ रु पये असून हे आरोपी सदर इंजेक्शन १० हजार ५०० रु पयांना विकत होते. कापूरबावडी पोलीस अधिक तपास पोलिस करीत आहेत.