धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई!

By अनिल गवई | Published: June 2, 2023 09:49 PM2023-06-02T21:49:49+5:302023-06-02T21:49:59+5:30

सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली. मात्र, यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

Three arrested for throwing stones at running vehicles, police action! | धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई!

धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई!

googlenewsNext

खामगाव: दहशत माजवून चोरी, लुटमार करण्याच्या उद्देशाने धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळ्यात ग्रामीण पोलिसांना अखेर शुक्रवारी यश आले. सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली. मात्र, यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

यासंदर्भात पोलीस सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे च्या मध्यरात्री नवीन राष्ट्रीय महामागार्वरील माक्ता कोक्ता शिवारात आठ ते दहा वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. यात एका लक्झरी बससह आठ ते दहा प्रवासी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. दहशत माजवून चोरी आणि लुटमार करण्याच्या उद्देशाने झालेल्या या प्रकरणात १ जून रोजी जळगाव जामोद येथील डॉ. राजेंद्र नामदेवराव तानकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ३५६, ३३६, ३३७, ३३८, ४२७, ३४ अन्वये तीन ते चार अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तक्रारीत एमएच २८ व्ही ७४९४ क्रमाकांची कार दगडफेक करून आरोपींनी थांबविली. गाडीतील महिलांच्या अंगावरील लंपास करण्याच्या उद्देशाने दहशत माजविल्याचे नमूद केले. घटनेनंतर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रकरण असल्याने, गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी गुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले.

सापळा रचून केली कारवाई
ग्रामीण पोलीसांनी आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला. खात्री पटल्यानंतर सापळा रचून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना हेरले. अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रविंद्र लांडे, हेकॉ देवराव धांडे, पोकॉ अजय काळे यांच्या पथकाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

एक आरोपी फरार
पोलीसांनी गजानन पांडुरंग सावरकर २२, सुधीर उपाख्य रिंकू विनायक ताठे २४, राजेश उपाख्य डोळ्या सुभाष पवार १८ यांना अकोला बायपासवरून ताब्यात घेतले. तर अनिकेत गणेश देशमुख फरार होण्यात यशस्वी झाला.
 

Web Title: Three arrested for throwing stones at running vehicles, police action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.