मोबाइलसह रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक, एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:29 AM2021-02-02T01:29:43+5:302021-02-02T01:29:59+5:30

Crime News : वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करून पसार झालेल्या पवन राम (वय २९, रा. रामनगर, ठाणे), संदीप अठवाल, (२६, रा. रामनगर) आणि विजय डिंग (२६, रा. भांडूप, मुंबई) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली

Three arrested for looting cash along with mobiles, one lakh and four thousand items confiscated | मोबाइलसह रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक, एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

मोबाइलसह रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक, एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करून पसार झालेल्या पवन राम (वय २९, रा. रामनगर, ठाणे), संदीप अठवाल, (२६, रा. रामनगर) आणि विजय डिंग (२६, रा. भांडूप, मुंबई) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वागळे इस्टेट, सीपी तलाव येथील सुनील निशाद (२६) यांच्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात २९ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० ते ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १७ मोबाईल आणि दोन डिस्प्ले असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती.  वागळे इस्टेट, शिवाजीनगरमधील सचिन सूर्यवंशी यांच्या धन्वंतरी मेडिकल दुकानातूनही २९ जानेवारीला रात्री ते ३० जानेवारीला स.  ६.३० च्या सुमारास शटर तोडून दोन हजारांची रोकड लंपास केली होती. तिघांनाही ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.  

सीसीटीव्हीमुळे उघड
दोन्ही प्रकरणांमध्ये सीसीटीव्हीतील चित्रण तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पवन याच्यासह तिघांची नावे तपासात समोर आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि सुनील शिंदे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये या तिघांनाही ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्यांनी या दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली.

Web Title: Three arrested for looting cash along with mobiles, one lakh and four thousand items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.