खवल्या मांजराची खवलं विक्रीसाठी आलेल्या तिघांना भाईंदरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 09:42 PM2019-06-18T21:42:29+5:302019-06-18T21:44:37+5:30

साडे पाच किलो वजनाच्या या खवलांची आतंरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रु पये इतकी किंमत आहे.

The three arrested for the sale of Khavla Manjra kavali were arrested from Bhaindar | खवल्या मांजराची खवलं विक्रीसाठी आलेल्या तिघांना भाईंदरमधून अटक

खवल्या मांजराची खवलं विक्रीसाठी आलेल्या तिघांना भाईंदरमधून अटक

Next
ठळक मुद्देरत्नागिरीवरून भाईंदर येथे आलेल्या तिघाजणांना नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. आरोपींनी खवलं कुठून आणली आणि कोणास  विक्रीसाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

मीरारोड - वन्यजीवातील संरिक्षत आणि अतिदुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची खवलं विकण्यासाठी रत्नागिरीवरून भाईंदर येथे आलेल्या तिघाजणांना नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. साडे पाच किलो वजनाच्या या खवलांची आतंरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रु पये इतकी किंमत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक टिकाराम थाटकर यांना रामदेव पार्क येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे मंडई जवळ खवल्या मांजराची खवलं विकण्यासाठी रत्नागिरीवरून काही तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने थाटकर यांच्यासह रविंद्र भलेराव, नवनाथ माने, नीलेश शिंदे, नितेश पाटील, चेतन राजपूत व आकाश वाकडे यांच्या पथकाने सापळा रचला होता.
सायंकाळी सहाच्या सुमारास एका गाडीने तिघे जण आले असता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेपाच किलो खवलं सापडली असून त्याची बाजारात सुमारे २२ लाख इतकी किंमत आहे. या प्रकरणी सतीश बिहरे (५१),सचिन ढोले (३८) व नीलेश उधे (३८) या तिघांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे . तिघेही रत्नागिरीचे राहणारे आहेत. आरोपींनी खवलं कुठून आणली आणि कोणास  विक्रीसाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: The three arrested for the sale of Khavla Manjra kavali were arrested from Bhaindar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.