लोणी काळभोर येथे हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 08:01 PM2018-11-26T20:01:16+5:302018-11-26T20:02:02+5:30
हत्यारे बाळगून हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तीन तरूणांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
लोणी काळभोर : बेकायदेशीररीत्या तलवार, कोयते असे प्राणघातक हत्यारे बाळगून कोणावर तरी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तीन तरूणांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आकाश प्रभाकर कांबळे ( वय २१ ), ॠषिकेश अनिल धेंडे ( वय २०, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, जयभवानी चौक, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली.) व सागर सुरेश क्षत्रीय ( वय १९, रा. गल्ली क्रमांक १०, घोरपडेवस्ती, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली.) या तिन जनांना अटक करण्यात आली आहे.
२५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समिर चमनशेख, सचिन मोरे हे खोले वस्ती येथे छत्रपती शिवराय कृती समितीचा एमआयटी विरोधातील बंदोबस्त पार पाडून पोलीस ठाण्यात आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ननवरे यांना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर झोपडपट्टीत असलेल्या पाण्याचे टाकी शेजारी आकाश कांबळे हा त्याचे दोन साथीदारांसमवेत थांबला आहे. त्यांच्याजवळ तलवार, कोयते अशी प्राणघातक हत्यारे असून ते कोणावर तरी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती खब-यांमार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीची शहनिशा करण्यासाठी पोलीस पथक गेले असता त्यांना अॅक्टीवा दुचाकी क्रमांक (एमएच.१२. एलवाय ५९८३) वर कांबळे बसलेला व त्यांचे शेजारी धांडे व क्षत्रिय हे दोघे तरूण ऊभे असलेले दिसले. तिघांना छापा मारून पकडून त्यांची अंगझडती घेतली असता आकाश कांबळे याचे हातात ६७ से.मी. लांब, २.५ से. मी. रूंदीची, टोकाकडे निमुळती होत गेलेली त्यास १२ से.मी. लांंबीची व ३ से. मी. रूंदीची गोल वतुर्ळाकार मुुठ असलेली तलवार मिळून आली. सागर क्षत्रीय याचे हातात तर ॠषिकेश धेंडे याचे कमरेला लोखंडी कोयता मिळून आला. पोलीसांनी तिघांना सदर हत्यारे कशासाठी जवळ बाळगली याची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यांचेकडे मिळून आलेली अॅक्टीवा दुचाकी व प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. व त्यांना भारतीय हत्यार कायदा कलमान्वये अटक गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.