तीने अंर्तवस्त्रातून आणले ८ कोटींचे कोकेन; केसाच्या वीगमध्येही लपवले होते कोकेन
By मनोज गडनीस | Updated: December 20, 2023 17:13 IST2023-12-20T17:13:40+5:302023-12-20T17:13:53+5:30
डीआरआयकडून पर्दाफाश

तीने अंर्तवस्त्रातून आणले ८ कोटींचे कोकेन; केसाच्या वीगमध्येही लपवले होते कोकेन
मुंबई - आदिस अबाबा येथून मुंबई विमानळावर दाखल झालेल्या एका परेदशी महिलेने चक्क तिच्या अंर्तवस्त्रात आणि केसाच्या वीगमधून कोकेन लपवून आणले होते. मात्र, केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) या तस्करीचा पर्दाफाश करत तिला अटक केली आहे. अंर्तवस्त्र आणि केसाच्या वीगमध्ये तीने एकूण ८९० ग्रॅम कोकेन लपवले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.