दिवसा घरफाेडी, दुचाकी पळविणाऱ्या तिघांना अटक; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 04:07 PM2021-08-29T16:07:40+5:302021-08-29T20:07:40+5:30

Crime News : लातूर पाेलिसांची कारवाई 

Three burglars arrested during the day; Five and a half lakh items confiscated | दिवसा घरफाेडी, दुचाकी पळविणाऱ्या तिघांना अटक; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवसा घरफाेडी, दुचाकी पळविणाऱ्या तिघांना अटक; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देपाेलिसांनी सांगितले, लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दित गत अनेक दिवसांपासून भरदिवसा, रात्रीच्या वेळी घरफाेडीच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत आहे. माेटारसायकलचाेरी प्रकरणी साहेबराव अकूंश जाधव (२४ रा. रमजानपूर ता. जि. लातूर ह.मु. लक्ष्मी काॅलनी, जुना औसा राेड, लातूर) याला पथकाने ताब्यात घेतले.

लातूर : शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दित भरदिवसा घरफाेडी आणि माेटारसायकल पळविणाऱ्या तिघांच्या मुसक्या लातूर पाेलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चार दुचाकींसह ५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांविराेधात जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दित गत अनेक दिवसांपासून भरदिवसा, रात्रीच्या वेळी घरफाेडीच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत आहे. याशिवाय, दुचाकी चाेरीचे सत्र थांबता थांबत नाही. या घटनांनी नागरिक कमालीचे बेजार आहेत. घरफाेडीसह इतर गुन्ह्यातील आराेपींच्या मागावर पाेलीस पथक आहे. पथकाला खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दिवसा घरफाेडीतील सुमीत दगडू गरगेवाड आणि राम दगडू गरगेवाड (रा. मळवटी राेड, नांदेड राेड लातूर) या अट्टल गुन्हेगारांच्या पाेलिसांनी माेठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. अधिक चाैकशी केली असता घरफाेड्या केल्याची कबुली या दाेघांनी दिली आहे.  त्यांच्याकडून साेन्याचे दागिने, माेटारसायकल असा एकूण ४ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात ३ तर चाकूर पाेलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल हाेताे. माेटारसायकलचाेरी प्रकरणी साहेबराव अकूंश जाधव (२४ रा. रमजानपूर ता. जि. लातूर ह.मु. लक्ष्मी काॅलनी, जुना औसा राेड, लातूर) याला पथकाने ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने माेटारसायकली चाेरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार माेटारसायकली असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलीस पथकाने जप्त केल्या आहेत. त्याच्याविराेधात लातूर शहरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात १ तर विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दाेन गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण सात गुन्ह्यांचा छडा लावला आहे.

Web Title: Three burglars arrested during the day; Five and a half lakh items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.