पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तीन संचालकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 09:50 PM2019-12-03T21:50:32+5:302019-12-03T21:51:08+5:30

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Three directors arrested in PMC Bank scam | पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तीन संचालकांना अटक

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तीन संचालकांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे या तिघांच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे.तत्कालीन संचालक जगदीश मुखी, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्य मुक्ती बावीसी, संचालक आणि कर्जवसुली (रिकव्हरी) समिती सदस्या तृप्ती बने अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३३५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी आणखी तिघांना अटक केली. तत्कालीन संचालक जगदीश मुखी, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्य मुक्ती बावीसी, संचालक आणि कर्जवसुली (रिकव्हरी) समिती सदस्या तृप्ती बने अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे.

देशभरात शाखा असलेल्या पीएमसी बॅँकेत साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दीड महिन्यापूर्वी रिझर्व्ह बॅँकेने बॅँकेवर निर्बंध आणले. त्यामुळे हजारो खातेदारांची कोट्यवधीची रक्कम अडकल्याने ऐन दिवाळीत त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत होते. बॅँकेने एचडीआयएलला ४,३५५ कोटी कर्ज बेकायदेशीरपणे दिलेले आहे. रणजीत सिंग हा कर्जवसुली समितीचा सदस्य होता. मात्र, त्याच्याकडून कर्जाच्या परतफेडीबद्दल योग्य कार्यवाही करण्यात आली नाही. उलट त्याकडे त्याने दुर्लक्ष केल्याचे आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या तपासातून स्पष्ट झाले. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी त्याला अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पाचारण केले होते. सुमारे चार तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

पीएमसी बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या दीड महिन्यात बॅँकेचे कार्यकारी संचालक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वेयम सिंग, एचडीआयएलचे प्रमुख राकेश वाधवा, त्याचा मुलगा सारंग, बॅँकेचे लेखा परीक्षक अनिता किर्डत, जयेश संघानी व केतन लोखंडवाला यांना अटक झालेली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे रमन सिंग याच्यावरील कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप बॅँकेच्या ठेवीदारांकडून करण्यात येत होता. आत या प्रकरणी आणखी काही संचालक व अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Three directors arrested in PMC Bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.