डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 07:21 PM2021-08-15T19:21:29+5:302021-08-15T20:29:05+5:30

Drowning Case : दोघेही आपल्या एकूण ९  मित्रांसह १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातिल चौसाळा येथील इसमाचा बुडून मृत्यू झाला.

Three drowned in Doha; Including one from Anjangaon along with two youths from Akola | डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश  

डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश  

Next
ठळक मुद्देशेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७) अकोट फैल अकोला अशी मृतांची नावे आहेत.

नरेंद्र जावरे 

चिखलदरा( अमरावती)  - चिखलदरा पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटक युवकांचा जत्राडोहच्या डोहात बुडून मृत्यू झाला रविवारी दुपारी ३:३०वाजता सदर घटना घडली. दोघांचे मृतदेह डोहाबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी आणले आहे. दोघेही आपल्या एकूण ९  मित्रांसह १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातिल चौसाळा येथील इसमाचा बुडून मृत्यू झाला. शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७) अकोट फैल अकोला अशी मृतांची नावे आहेत.

एम एच ३० ए झेड ४६२६ व एम एच ०४ एफ एफ ४१२४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नऊ मित्र आले होते, चिखलदरा पर्यटन स्थळावरील विविधी पॉइन्ट्सच्या भेट दिल्यानंतर, सर्व मित्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागाअंतर्गत जत्राडोह पॉईंट आहे. येथील कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात करण्यास सक्त मनाई आहे तरीसुद्धा पर्यटक उतरतात. रविवारी सुद्धा मित्र एकमेकांच्या अंगावर पाणी जात असताना काही खोल पाण्यात उतरल्याने दोघे बुडून मृत्यू पावल्याची पोलिसांनी लोकमतशी बोलताना सांगितले पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश राठोड, सुधीर पोटे, आशिष वरघट,रितेश देशमुख सहकारी करीत आहे दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते

खटकाली डोहात एकाचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारया पोपटखेडा खटकाली मार्गावरील पीर बाबा नदीच्या डोहात एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. हरीश जानराव काळमेघ  ३८रा चौसाळा तालुका अजनगाव असे मृताचे नाव आहे. शनिवारी आंघोळीसाठी डोहात उतरले असता बुडून मृत्यू झाला त्यांचा मृतदेह रविवारी काढण्यात आला पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अविनाश देशमुख प्रभाकर चव्हाण रायबा जावरकर करीत आहे.

 

Web Title: Three drowned in Doha; Including one from Anjangaon along with two youths from Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.