तीन गुंड २ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार, तिघांवरही गंभीर गुन्ह्यांची नोंद
By नितिन गव्हाळे | Published: February 28, 2023 06:57 PM2023-02-28T18:57:19+5:302023-02-28T18:58:00+5:30
कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्यात आदेश दिले आहेत.
नितीन गव्हाळे
अकोला : जिल्हा अंतर्गत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसावा याकरिता खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रीरंग सणस यांनी खदान हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुंड आशिष ईश्वर लोध्या (२५), पूर्वेश राजेश शाह (२८), शिवम विरेंन्द्रसिंग ठाकूर (रा. राधाकिसन प्लॉट) या तिघांना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
या तीनही गुंडांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे पाहता, त्यांच्या विरुद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तीनही गुंडांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता रहावी याकरिता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्यात आदेश दिले आहेत.