शाळा बुडवून तीन मुली पार्कात गेल्या, मजा केली, व्हिडिओही बनवला; मग विष प्राशन केलं! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 06:23 PM2022-10-29T18:23:06+5:302022-10-29T18:24:38+5:30

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी दोन मुलींचा विष प्राशन केल्यानं मृत्यू झाला आहे तर तिसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे.

three girls eat poison in indore after bunking school 2 dead | शाळा बुडवून तीन मुली पार्कात गेल्या, मजा केली, व्हिडिओही बनवला; मग विष प्राशन केलं! नेमकं काय घडलं?

शाळा बुडवून तीन मुली पार्कात गेल्या, मजा केली, व्हिडिओही बनवला; मग विष प्राशन केलं! नेमकं काय घडलं?

googlenewsNext

इंदूर-

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी दोन मुलींचा विष प्राशन केल्यानं मृत्यू झाला आहे तर तिसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिघंही शाळा बुडवून शहरातील बागेत मजा-मस्ती करण्यासाठी गेल्या होत्या. तिघांनीही बागेत खूप मस्ती केली आणि त्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडीओ पाहून त्यांच्या मनात आत्महत्येसारखा भयावह विचार आला असेल असं अजिबात वाटणार नाही. तिघांनीही सायंकाळी उशिरा विष प्राशन केलं. दोघांचा मृत्यू झाला तर तिसरी विद्यार्थीनी गंभीर अवस्थेत आहे. तिच्यावर एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

इंदूरमधील राजेंद्र नगर परिसरातील प्रादेशिक उद्यानात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. पूजा आणि पलक अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तिसरीचं नाव आरती असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचा रोहित याच्यासोबत भांडण झालं होतं. त्यामुळेच त्यांनी विष प्राशन केलं. 

दोघींनी विष प्राशन केलं, तिसरी घाबरली अन्...
पलकने एवढंच सांगितलं की पूजा तिच्या कुटुंबियांवर काही गोष्टींवरून नाराज होती. याच कारणावरून पूजाने विष प्राशन केलं होतं. त्याचवेळी पलक आणि पूजा यांना विष प्राशन करताना पाहून आरती घाबरली. सुमारे अर्ध्या तासानंतर तिघांनाही माय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिघी जिवंत होत्या. उपचारादरम्यान रात्री पलक आणि पूजा यांचा मृत्यू झाला.

शाळा बुडवून पोहोचल्या होत्या पार्कात
तिन्ही मुली आष्टा येथील मॉडेल स्कूलमध्ये शिकत होत्या. तिघीही अभ्यासात चांगल्या होत्या आणि दहावीत त्यांना ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. शुक्रवारी तिघही गणवेशाविना शाळेत पोहोचल्या होत्या. गार्डने दोन जणांना गेटवर थांबवलं तेव्हा तिसरीही त्यांच्याच सोबत परतली. त्यानंतर या तिघीही इंदूरच्या प्रादेशिक उद्यानात जाऊन हे आत्मघाती पाऊल उचलले.

Web Title: three girls eat poison in indore after bunking school 2 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.