बेळगावकडे कत्तलीसाठी गायी नेणारा टेम्पो पकडला; तिघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 11:29 PM2020-11-19T23:29:20+5:302020-11-19T23:32:15+5:30

हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीवरुन कळे पोलिसांची कारवाई

three held for transporting cattle to belgaum | बेळगावकडे कत्तलीसाठी गायी नेणारा टेम्पो पकडला; तिघांविरोधात गुन्हा

बेळगावकडे कत्तलीसाठी गायी नेणारा टेम्पो पकडला; तिघांविरोधात गुन्हा

Next

गगनबावड्याकडून बेळगावकडे विनापरवाना व बेकायदेशीर कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारा टेम्पो कळे (ता. पन्हाळा) येथे कळे पोलिसांकडून पकडण्यात आला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीवरुन कळे पोलिसांनी सदरची कारवाई केली.

या प्रकरणी रवी सिध्दाप्पा नाईक (वय- २७) रा. वडरट्टी ( ता. अथणी, जि. बेळगाव), चेतन श्रीसैल नाईक (वय- १९) रा. वडरट्टी (ता.अथणी, जि. बेळगाव) व अल्ताफ बापुल शेख (वय- २२) रा. ऐनापूर, (ता. अथणी, जि. बेळगाव ) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या कारवाईत ४ गाई, ३ कालवडी व ३ खोंड अशी एकूण १० गोवंश जातीची जनावरे असा एकूण १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल‍ा. न्या. श्रीमती एस. एस. राऊळ, क- स्तरसह दिवाणी न्यायाधीश, जिल्हा न्यायालय यांनी आरोपींना शनिवारपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे. गायी संगोपनासाठी कणेरी मठ येथील  गोशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विलास सिंघन प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

Web Title: three held for transporting cattle to belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.