भिंत कोसळून तिघांचा मृत्यू प्रकरण : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 12:27 PM2019-07-04T12:27:55+5:302019-07-04T12:29:20+5:30

बाजारपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Three killed in school wall collapse case : FIRs filed against 5 3people who had make unauthorized construction | भिंत कोसळून तिघांचा मृत्यू प्रकरण : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भिंत कोसळून तिघांचा मृत्यू प्रकरण : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देदोन घरांवर पडल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.झालेल्या दुर्घटनेत या दोघींचा मृत्यु झाल्याचे त्याच्या मरणास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे .

कल्याण - उर्दू शाळेची भिंत कोसळून भिंतीचा काही भाग लगतच्या दोन घरांवर पडल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इकलाख मौलवी, अमजद मौलवी, सलमान मौलवी, सलीम मौलवी, सलीम मौलवी, जावेद मौलवी या पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास दुर्गाडी परिसरात असलेल्‍या नॅशनल उर्दु शाळेची संरक्षण भिंत कोसळून घरावर पडल्याने शोभा कांबळे या वृद्ध महिलेसह तीन वर्षीय चिमुकला हुसेन सय्यद व त्याची आई करीमा सय्यद यांचा मृत्यू झाला तर आरती कर्डिले ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात नोंद करत पुढील तपास सुरु करण्यात आला होता अखेर या प्रकरणी इकलाख मौलवी ,अमजद मौलवी ,सलमान मौलवी ,सलीम मौलवी ,सलीम मौलवी ,जावेद मौलवी या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे या पाच जनावर सदर घरे पालिकेची बांधकाम परवानगी न घेता अनधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या या खोल्यामध्ये मयत शोभा कांबळे ,करीमा सय्यद यांच्याकडून २ हजार रुपये भाडे घेत होते तसेच या पावसळ्यात या घराच्या भितींतून पानी झिरपट असल्याने घराची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली होती मात्र या कडे दुर्लक्ष केले त्यामुळे भीती कमकुवत झाल्या. झालेल्या दुर्घटनेत या दोघींचा मृत्यु झाल्याचे त्याच्या मरणास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे .

Web Title: Three killed in school wall collapse case : FIRs filed against 5 3people who had make unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.