स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीतून तीन मोबाईल लांबविले

By सागर दुबे | Published: April 17, 2023 08:32 PM2023-04-17T20:32:21+5:302023-04-17T20:32:37+5:30

खोलीमध्ये त्याच्यासोबत आणखी चार विद्यार्थी रहायला आहे. रविवारी रात्री दीपक हा खोलीच्या खिडकीमध्ये मोबाईल ठेवून झोपून गेला होता.

Three mobile phones were removed from the room of students giving competitive exams | स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीतून तीन मोबाईल लांबविले

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीतून तीन मोबाईल लांबविले

googlenewsNext

जळगाव : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या खोलीमधून अज्ञात चोरट्याने तीन मोबाईल लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अजय कॉलनी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कु-हा पानाचे (ता.भुसावळ) येथील मुळचा राहणारा दीपक रघुनाथ काळे हा विद्यार्थी अजय कॉलनीमध्ये भाड्याच्या खोलीमध्ये वास्तव्यास असून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. खोलीमध्ये त्याच्यासोबत आणखी चार विद्यार्थी रहायला आहे. रविवारी रात्री दीपक हा खोलीच्या खिडकीमध्ये मोबाईल ठेवून झोपून गेला होता. सोमवारी सकाळी ९ वाजता जाग आल्यानंतर त्याला खिडकीमध्ये मोबाईल दिसून आला नाही. तसेच खोलीतील महेश पाटील व मनिष धांडे या विद्यार्थ्यांना सुध्दा त्यांचे मोबाईल दिसून आले नाही. अखेर मोबाईलचा शोध घेऊन सुध्दा मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याची खात्री झाली. दुपारी दीपक काळे याच्या फिर्यादीवरून चोरट्याविरूध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

Web Title: Three mobile phones were removed from the room of students giving competitive exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.