जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचारिकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 09:33 PM2021-11-09T21:33:14+5:302021-11-09T21:34:01+5:30

Hospital Fire Case : चौकशी अधिकारी व उपअधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई

Three nurses, including a medical officer, arrested in district hospital fire | जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचारिकांना अटक

जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचारिकांना अटक

Next

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात आज सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे.

 वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे.


दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. शनिवारी (६ नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या दुर्घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्वतः ही काल, सोमवारी ही माहिती दिली होती. त्यातच आज, मंगळवारी तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक केली आहे. सदरच्या अटकेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  याप्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.

Web Title: Three nurses, including a medical officer, arrested in district hospital fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.