दुर्दैवी! गुटखा फॅक्टरीमध्ये लिफ्टच्या अपघातात ३ कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 11:51 PM2023-01-08T23:51:45+5:302023-01-08T23:53:09+5:30
दिल्लीतील नरैना भागातील गुटखा कारखान्यात लिफ्टचा अपघात झाला. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन ती पडली.
दिल्लीतील नरैना भागातील गुटखा कारखान्यात लिफ्टचा अपघात झाला. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन ती पडली. पोलीस तपास सुरू आहे. प्रकरण दिल्लीच्या नारायणा औद्योगिक क्षेत्राचे आहे. जेथे फेज 1 परिसरात कारखान्याची लिफ्ट तुटली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे. यामध्ये जेजे कॉलनी, इंद्रापुरी येथील रहिवासी 30 वर्षीय कुलवंत सिंग, जेजे कॉलनी, इंद्रपुरी येथील 26 वर्षीय दीपक कुमार यांचा मृत्यू झाला आहे. या दोघांशिवाय नारायण विहारमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय सनीचा मृत्यू झाला आहे. जखमींवर बीएलके रुग्णालयात उपचार सुरू असतानाच या अपघातात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुरज असे जखमी व्यक्तीचे नाव असून तो दिल्लीच्या गोल मार्केटमध्ये राहतो. जखमींचे वय अवघे 24 वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर दिल्लीतील बीएलके रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर पुन्हा दगडफेक; आठवड्यात तिसरी घटना
लिफ्ट कोसळण्याची अशीच एक घटना मुंबईतही समोर आली आहे, जिथे 25 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ४ जानेवारी रोजी घडली. बुधवारी दुपारी ही घटना मुंबईतील विक्रोळी परिसरात घडली. मुंबईतील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे प्रशासनाने सांगितले. अपघाताच्यावेळी या इमारतीच्या लिफ्टमध्ये चार जण प्रवास करत होते. ही लिफ्ट तुटून थेट तळमजल्यावर पडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून लिफ्टचा दरवाजा उघडला. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लिफ्टमध्ये अडकलेल्या चार लोकांपैकी तीन जण स्वतःहून बाहेर पडण्यात यशस्वी झाले तर चौथा व्यक्ती आत अडकला होता.