तानसा नदीत तीन तृतीयपंथी बुडाले; शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:33 PM2021-10-07T17:33:52+5:302021-10-07T17:34:09+5:30
खानिवडे येथे टोलनाका असल्याने या ठिकाणी तृतीपंथीय यांचा नेहमी वावर असतो. गुरुवारी घटस्थापना असल्याने नदीत आंघोळ करून दुर्गापूजा करण्याचे सहा तृतीयपंथींनी ठरवले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : खराटतारा येथे तानसा नदीत आंघोळीसाठी नदीत गेलेले तीन तृतीपंथीय पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असून वसई-विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत शोध मोहीम हाती घेतली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
खानिवडे येथे टोलनाका असल्याने या ठिकाणी तृतीपंथीय यांचा नेहमी वावर असतो. गुरुवारी घटस्थापना असल्याने नदीत आंघोळ करून दुर्गापूजा करण्याचे सहा तृतीयपंथींनी ठरवले होते. तानसा नदीत अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले. तर तीन बाजूला राहिले, पण खोल पाण्यात गेलेल्या तिघांना पोहता येत नसल्याने ते नदीत बुडाले. त्यांचे तीन साथीदार नदीबाहेर येत ते बुडाले असल्याची माहिती त्यांनी विरार पोलिसांना दिली.
अरिका (वय ४०), प्राची (२३) व सुनीता (२७) अशी बुडालेल्या तृतीयपंथींची नावे असून वसई-विरार शहर महापालिका अग्निशमन दल, मुंबई सायन येथून आलेले दल यांनी बोटीतून तानसा नदीत शोध मोहीम हाती घेतली आहे.