भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी; वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त
By नितीन पंडित | Published: December 6, 2022 03:49 PM2022-12-06T15:49:26+5:302022-12-06T15:50:20+5:30
दुसऱ्या घटनेत आझका अपार्टमेंट कणेरी या ठिकाणी राहणारा अश्रफ युसूफ शहा यांनी आपल्या इमारतीच्या खाली पार्किंग करून ठेवलेली पंधरा हजार रुपये किमतीची एव्हिएटर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधारात पळवून नेली आहे.
भिवंडी - भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी भिवंडी शहरात वाहन चोरीच्या एकूण तीन घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टार हॉटेल पटेल कंपाऊंड या परिसरात राहणाऱ्या जमीर वहीद कुरेशी याने आपली मोटर सायकल गायत्री नगर अमृत चाळ या परिसरात लॉक करून उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांने ती चोरी केली, अशी तक्रार केली आहे.
दुसऱ्या घटनेत आझका अपार्टमेंट कणेरी या ठिकाणी राहणारा अश्रफ युसूफ शहा यांनी आपल्या इमारतीच्या खाली पार्किंग करून ठेवलेली पंधरा हजार रुपये किमतीची एव्हिएटर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधारात पळवून नेली आहे.
तर तिसरी घटना ही शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून टेमघर स्वयंसिद्धी कॉलेज जवळील भंगार विक्री व्यवसायीक संगम केसरवानी याने आपल्या बिल्डिंग समोरील मोकळा जागेत पार्किंग करून ठेवलेली दुचाकी स्कुटर अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. या तिन्ही घटनांबाबत विविध संबंधित पोलिस ठाण्यात वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडी शहरात वाढत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये आपल्या वाहनांच्या सुरक्षेसंदर्भात भीतीचे वातावरण पसरले असून भिवंडी पोलीस प्रशासनाने त्यासंदर्भात ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.