पुण्यातील होर्डिंग अपघाताला जबाबदार असणाऱ्या तीन कामगारांना अटक : महिनाभर होते फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 09:06 PM2018-11-13T21:06:12+5:302018-11-13T21:10:04+5:30

जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग पडून त्याखाली सापडल्याने चार जणांचा मृत्यु झाला होता़.

Three workers arrested in Pune's boating accident: Detained for a month | पुण्यातील होर्डिंग अपघाताला जबाबदार असणाऱ्या तीन कामगारांना अटक : महिनाभर होते फरार

पुण्यातील होर्डिंग अपघाताला जबाबदार असणाऱ्या तीन कामगारांना अटक : महिनाभर होते फरार

Next
ठळक मुद्देखंडणी विरोधी पथकाची कामगिरी या प्रकरणी निष्काळजीपणा दाखविलेल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे : होर्डिंग काढताना ते कोसळून झालेल्या अपघात गेले महिन्याभरापासून फरार असलेल्या होर्डिंग कापणाºया तिघांना पकडण्यात खंडणी विरोधी पथकाला यश मिळाले आहे़. 
रामदास सरोदे (रा़ आष्टी), धनंजय भोळे (रा़ बार्शी) आणि देवदास कोठारी (रा़ लोहार, छत्तीसगड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत़. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून ठेकेदार मल्लिकार्जुन हा अजून फरार आहे़. 
जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग पडून त्याखाली सापडल्याने चार जणांचा मृत्यु झाला होता़. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय ४२, रा. विकासनगर, देहूरोड) आणि त्याच्या सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे ( वय ५७, रा.कसबा पेठ) व त्यानंतर कॅप्शन अडव्हर्टाझिंग कंपनीचा मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालीद फकिह (वय ५४, रा. अर्जुन मनसुखानी पथ, कोरेगाव रस्ता) यांना अटक केली होती़. 
या प्रकरणी निष्काळजीपणा दाखविलेल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या घटनेनंतर होर्डिंग कोसळताना ते कापत असलेले ही तीनही कामगार पळून गेले होते़. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे व त्यांचे सहकारी हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसरात १२ नोव्हेंबरला गस्त घालत होते़. त्यावेळी पोलीस हवालदार काळभोर यांना या कामगारांविषयी माहिती मिळाली होती़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार घुगे व त्यांचे सहकारी हडपसर येथील वैभव टॉकीजसमोर गेले़ तेथे तिघे जण संशयास्पदरित्या थांबलेले दिसून आले़. पोलिसांनी त्यांना घेरून ताब्यात घेतले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला़. तिघांना बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहेत.

Web Title: Three workers arrested in Pune's boating accident: Detained for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.