कारवर चादर टाकली अन् आतमध्ये बसला; आयटी इंजिनिअरने विचित्र प्रकारे आयुष्य संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 05:22 PM2022-12-21T17:22:17+5:302022-12-21T17:22:53+5:30
बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने अजब प्रकाराने आत्महत्या केली आहे. आधी कारवर चादरी टाकून काचा ...
बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने अजब प्रकाराने आत्महत्या केली आहे. आधी कारवर चादरी टाकून काचा झाकल्या, नंतर मागच्या सीटवर आतमध्ये बसला व आपले आयुष्य संपविले आहे. हा प्रकार पाहून पोलिसही हादरून गेले आहेत.
५१ वर्षीय विजय कुमारने कारमध्ये आत्महत्या करण्याचा विचित्र प्रकार निवडला होता. त्याने त्यासाठी नायट्रोजन सिलिंडर खरेदी केला होता. तो त्याने कारमध्ये ठेवला होता. वरून कारच्या काचा चादरींनी झाकल्या होत्या. आतमध्ये बसून त्याने तोंडाला पॉलिथीन पिशवीने गुंडाळले होते. या पिशवीला सिलिंडरचा पाईप जोडून त्याने नायट्रोजन शरीरात घेऊन आत्महत्या केली.
सोसायटीतील लोकांना कार चादरींनी झाकल्याचे दिसल्याने काहीसे वेगळे वाटले. शंका आली म्हणून लोकांनी चादरी बाजुल्या केल्या आणि आतमध्ये पाहिले. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. तेव्हा विजय कुमार अत्यवस्थ अवस्थेत होता. त्याला तातडीने हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. परंतू वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
विजय कुमारच्या नातेवाईकांनुसार त्याला गंभीर स्वरुपाचा हृदय विकार होता. त्याने काही दिवसांपूर्वीच कुटुंबासोबत मृत्यूबाबत भाष्य केले होते. ही घटना बंगळुरुच्या महालक्ष्मी लेआऊटमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे.