थरारक पाठलाग: शस्त्राने वार, गोळीबार,चौघे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:19 PM2017-08-28T18:19:30+5:302017-08-28T18:21:10+5:30

अहमदनगर : दरोडेखोरांचा थरारक पाठलाग करणाºया पोलिसांवर धारदार शस्त्राने वार केल्याने एक पोलीस जखमी झाला. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार आरोपी जखमी झाले. सोमवारी पहाटे ३ ते ५ वाजेच्या दरम्यान दरोडेखोर व पोलिसांमधील हा थरार रंगला. पोलिसांनी पाठलाग व नाकाबंदी करून चार दरोडेखोरांना जेरबंद केले.

Thrilling chase: Weapons, firefighters, four others caught | थरारक पाठलाग: शस्त्राने वार, गोळीबार,चौघे पकडले

थरारक पाठलाग: शस्त्राने वार, गोळीबार,चौघे पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देलोणी-श्रीरामपूर रस्त्यावर सोमवारी रंगला थरार
मदनगर : दरोडेखोरांचा थरारक पाठलाग करणाºया पोलिसांवर धारदार शस्त्राने वार केल्याने एक पोलीस जखमी झाला. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार आरोपी जखमी झाले. सोमवारी पहाटे ३ ते ५ वाजेच्या दरम्यान दरोडेखोर व पोलिसांमधील हा थरार रंगला. पोलिसांनी पाठलाग व नाकाबंदी करून चार दरोडेखोरांना जेरबंद केले.तौफिक सत्तार शेख (वय ३१, रा. प्रभाग १, श्रीरामपूर), राहुल विलास शेंडगे (वय १९, रा. अशोकनगर, निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर) यांना पिंप्री निर्मळ गावाजवळील डाळिंबाच्या बागेत मोठ्या शिताफीने पकडले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात राहुल शेंडगे हा जखमी झाला. त्याच्याबरोबर झटापटीत तौफिक शेख हा देखील जखमी झाला. या दोघांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवार २७ आॅगस्टला रात्री ११ वाजेच्या सुमारास दत्तनगर (श्रीरामपूर )येथील संतोष पवार व त्याच्या घराजवळ तौफिक शेख, राहुल शेंडगे, गौरव बागुल व किरण काकफळे हे आरोपी गांजा पित बसले होते. तेव्हा पवारने हरकत घेतली. तेव्हा पवार यांनी हरकत घेत विचारणा केल्याने आरोपींनी घरात घुसून पवार व त्याच्या कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवून काठीने व कत्तीने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरातील दूरचित्रवाणी संच,रोख रक्कम व दागिने लुटून आरोपी पसार झाले. त्यानंतर या दरोडेखोरांनी श्रीरामपूर ते लोणी रस्त्यावर आयशर वाहन ((क्रमांक एम. एच.१५ई जी ५३९३) व छोटा हत्ती वाहन (क्रमांक एम. एच. १७ बी डी २२२९)या दोन वाहनांना अडवून त्यातील लोकांना कत्तीने मारहाण करून जखमी करून त्यांच्याकडील मोबाईल, ए.टी.एम. कार्ड व रोख रक्कम असे जबरीने चोरून नेले. या रस्ता लुटीची माहिती लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना मिळताच त्यांनी पहाटे ३ वाजेच्या सुमारास राजुरी, ममदापूर येथे पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने नाकेबंदी करुन आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. ............................चार आरोपींना अटकतौफिक सत्तार शेख (वय ३१, रा. श्रीरामपूर), राहुल विलास शेंडगे (वय १९, रा. अशोकनगर, श्रीरामपूर), गौरव रवींद्र बागुल व किरण सुरेश काकफळे (सर्व रा. श्रीरामपूर) या चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाठलाग करून अटक केली.

Web Title: Thrilling chase: Weapons, firefighters, four others caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.