थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 16:17 IST2020-06-11T16:14:05+5:302020-06-11T16:17:08+5:30
बदलापूर कात्रप परिसरात एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आई आणि तिच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे.

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
बदलापूर - बदलापूर कात्रप परिसरात बुधवारी रात्री एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या सासूने फिर्याद दिली असून याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूर कात्रप परिसरात एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आई आणि तिच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. चाकूने शरीरावर वार करून ही हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री जेवण उरकल्यावर संबंधित महिला ही आपल्या मुलीला घेऊन घरातील हॉलमध्ये झोपली होती. तर त्या महिलेची सासू बेडरूममध्ये झोपली होती. रात्री अकरा वाजताच्या सुमारास सासूला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने ताडकन उठल्या आणि त्यांनी पाहिले असता ती सहा वर्षाची मुलगी आणि तिची आई या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या होत्या. लागलीच सासूने शेजाऱ्यांना बोलावले. परंतु शेजाऱ्यांच्या मदतीच्या आधीच त्या दोघींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकाराचा तपास करीत आहे. संबंधित महिला काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याचं शेजाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही
खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या
संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जायमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह