थरारक! भाऊ बहिणीची हत्या करून डोळे काढले बाहेर अन् कान कापले,काका आहे आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 09:53 PM2022-01-29T21:53:18+5:302022-01-29T21:53:49+5:30
Murder Case : मुलांची हत्या केल्यानंतर आरोपीने डोळे का काढले याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नवी दिल्ली : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निष्पाप भाऊ-बहिणीच्या हत्येनंतर दोघांचेही डोळे काढण्यात आले. मृत मुलांच्या काकावर खुनाचा आरोप आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील ही घटना आहे. मुलांची हत्या केल्यानंतर आरोपीने डोळे का काढले याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
काय प्रकरण आहे?
मुलांचे वडील प्रेम मरांडी सांगतात की, गुरुवारी संध्याकाळी गावातीलच मोहाली टोला येथे म्हशींची झुंज झाली. प्रेम मरांडीही तेथे गेले. यावेळी त्यांचे चुलत भाऊ नेहरू मरांडी हे देखील तिथे उपस्थित होते. प्रेमने सांगितले की, म्हशींची झुंज पाहिल्यानंतर तो काही कामानिमित्त कुठेतरी गेला होता, त्यानंतर त्याचा चुलत भाऊ नेहरू उर्फ तुर्का त्याच्या घरी पोहोचला. नेहरूने प्रेमच्या मुलांना, 10 वर्षांच्या मार्शिला मरांडी आणि तिचा धाकटा भाऊ, 9 वर्षांचा बाबुलाल मरांडी यांना सांगितले त्यांचे वडील दारू पिऊन कुठेतरी पडले होते.
तुर्काच्या सांगण्यावरूननुसार, भाऊ आणि बहिण आपल्या काकासह आपल्या वडिलांना शोधण्यासाठी गेले. प्रेम त्याच्या घरी पोहोचल्यावर तुर्का आपल्या घरी येऊन त्याने खोटी बतावणी करून दोन्ही मुलांना सोबत नेल्याचं समजलं. यानंतर मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुक्रवारी सकाळी गावातील शेतात दोन्ही मुलांचे मृतदेह विकृत अवस्थेत आढळून आले.
मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत असून तिचा एक डोळा काढण्यात आला असून कान कापण्यात आले आहेत. तसेच मुलाचा एक डोळाही काढण्यात आला असून कानही कापण्यात आले आहेत. मुलांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. मुलांचे मृतदेह सापडल्यापासून तुर्का हा फरार असून पोलिसांनी त्याचा भाऊ गोमस्त मरांडी, वडील प्रधान मरांडी आणि आई पूर्ती हंसदा यांना अटक केली आहे.
आरोपींनी मुलांचे डोळे का काढले आणि कान का कापले याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे.