थरारक! बसमध्ये बेवारस बॅगा सापडल्याने प्रवाश्यांमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:52 PM2018-12-27T16:52:43+5:302018-12-27T16:58:40+5:30

बेवारस बॅगांमुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींना या बॅगेत स्फोटकं तर नाही ना अशी शंका वाटू लागली. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी येऊन बॅगांची तपासणी केल्यानंतर प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हा थरार १ तासभर रंगला होता. 

Thrilling! Sensational excitement in the bus after finding the unmanned bag | थरारक! बसमध्ये बेवारस बॅगा सापडल्याने प्रवाश्यांमध्ये खळबळ 

थरारक! बसमध्ये बेवारस बॅगा सापडल्याने प्रवाश्यांमध्ये खळबळ 

ठळक मुद्देबेवारस बॅगांमुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बॅगा पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होतीपोलिसांनी बॅगा उघडून पहिल्या असता त्यात कागदपत्रे, बँक पासबुक इत्यादी सामान आढळून आले 

डोंबिवली -  निवासी बसमध्ये बेवारस दोन बॅगा सापडल्याने प्रवाश्यांमध्ये एकाच खळबळ उडाली होती. त्यामुळे बॅगांच्या तपासणीदरम्यान प्रवाश्यांना बसमधून उतरवून केडीएमटी बस 1 तास थांबून ठेवण्यात आली होती. बेवारस बॅगांमुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींना या बॅगेत स्फोटकं तर नाही ना अशी शंका वाटू लागली. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी येऊन बॅगांची तपासणी केल्यानंतर प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हा थरार १ तासभर रंगला होता. 

एमआयडीसी परिसरातील ओमकार शाळेच्या नजीक असलेल्या बस स्टॉपवर डोंबिवलीकडे जाणारी बस आली असता शेवटचा सीटवर दोन बॅगा बेवारस असल्याचे प्रवाश्यांनी कंडक्टरचा लक्षात आणून दिले. मात्र, चौकशी केल्यानंतर त्या बसमधील कोणत्याही प्रवाश्याची नसल्याने कंडक्टरने पोलीस येईपर्यंत बस थांबवून त्या बॅगा रस्त्याच्या कडेला ठेवल्या. पोलीस येऊन बॅगेची तपासणी करेपर्यंत साधारण 1 तास गेला. बॅगा पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होती. पोलिसांनी बॅगा उघडून पहिल्या असता त्यात कागदपत्रे, बँक पासबुक इत्यादी सामान आढळून आले. कागदपत्रे व ओळख पत्रावरून गिरीश शहा नावाच्या इसमाची ती बॅग असल्याचे पोलिसांना कळले आहे.

 

Web Title: Thrilling! Sensational excitement in the bus after finding the unmanned bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.