‘तपोवन’वर दगड फेकणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:17 AM2019-05-11T00:17:17+5:302019-05-11T00:19:07+5:30

आंबिवली स्थानकानजीक रेल्वे फाटकाजवळ तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या दोघांपैकी एकाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुणे येथून अटक केली.

 Throwing stone on 'Tapovan', one Arrested | ‘तपोवन’वर दगड फेकणारा अटकेत

‘तपोवन’वर दगड फेकणारा अटकेत

Next

डोंबिवली - आंबिवली स्थानकानजीक रेल्वे फाटकाजवळ तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या दोघांपैकी एकाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुणे येथून अटक केली. तर दुस-या आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी अल्पवयीन आहे का, याचा तपास करण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात केल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी दिली.

तपोवन एक्स्प्रेसवर दोघे जण दगडफेक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याआधारे दोघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करून लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यासाठी दोन पथकही स्थापन केली होती. तपासाधिकारी पंढरीनाथ भोसले यांच्याकडे त्याची जबाबदारी आहे. मात्र, एका आरोपीला पुणे येथून ताब्यात घेतले आहे. तर, दुस-याचा शोध सुरू असल्याचे बारटक्के यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अटक आरोपी आंबिवलीतील इराणी वस्तीमधील रहिवासी आहे. त्याच्या शाळेच्या दाखल्यानुसार तो अल्पवयीन नाही. परंतु, आधारकार्डवरील जन्मतारखेनुसार तो अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याबाबतच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दुचाकी वडिलांच्या नावे
एक्स्प्रेसवर दगडफेक केल्यानंतर दोन्ही आरोपी दोन दुचाकीवरून पसार झाले होते. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातील एक दुचाकी अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांच्या नावे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दुसरा आरोपी लवकरच सापडेल, असा विश्वास बारटक्के यांनी व्यक्त केला.

Web Title:  Throwing stone on 'Tapovan', one Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.