अरेरावी! विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांनी टीसींना केली मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 02:57 PM2019-12-25T14:57:06+5:302019-12-25T14:58:36+5:30

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Ticketless men manhandle TCs at two stations | अरेरावी! विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांनी टीसींना केली मारहाण  

अरेरावी! विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांनी टीसींना केली मारहाण  

googlenewsNext
ठळक मुद्दे टीसींना मारहाण केल्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - एकाच दिवशी रेल्वेच्या २ टीसींना मारहाण केल्याची धक्कादायक घटना किंग्ज सर्कल आणि वांद्रे स्थानकांवर घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून दोन्ही घटनांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या अरेरावीमुळे टीसींना मारहाण करण्यात आली आहे. टीसींना मारहाण केल्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकातून तौफीक कुरेशी (२९)आणि अन्सारी रेहान अन्वर इकबाल अहमद (२७) हे  प्रवास करत होते. संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास हे दोन्हा प्रवासी किंग्ज सर्कल स्थानकात उतरले. स्थानकातून जात असताना टीसी हरेराम शर्मा यांनी या दोन प्रवाशांकडे तिकिटांची विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची कारणं दिली. शर्मा यांनी दंड भरण्यास सांगितलं. मात्र, त्यांनी शर्मा यांना रेल्वे रुळांवर फेकले. जखमी झालेल्या शर्मा यांना भायखळा येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्या उजव्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे.या घटनेमध्ये शर्मा यांच्या हाताला आणि पाठीला मार लागला आहे. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

वांद्रे स्थानकात वरिष्ठ टीसी असलेल्या विवेककुमार राय यांना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एक प्रवासी विनातिकीट प्रवास करून वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उतरला. तिकीट नसतानाही त्या प्रवाशाने राय यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या प्रवाशाने देखील टीसीला धक्का दिला.जोरदार धक्काने राय रेल्वे रुळांवर पडले आणि जखमी झाले. राय यांना उपचारासाठी जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.या प्रकरणी अज्ञाताविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा तपास घेतला जात आहे.

Web Title: Ticketless men manhandle TCs at two stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.