पत्नीच्या तोंडाला टेप लावून हातपाय बांधले तर मुलाच्या कपाळावर बंदूक रोखली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 09:38 PM2022-01-05T21:38:14+5:302022-01-05T21:38:41+5:30

Dacoity Case : खळबळजनक घटना CCTV मध्ये कैद

Tied wife's hands and feet with tape over her mouth and stopped the gun on the child's forehead. | पत्नीच्या तोंडाला टेप लावून हातपाय बांधले तर मुलाच्या कपाळावर बंदूक रोखली अन्...

पत्नीच्या तोंडाला टेप लावून हातपाय बांधले तर मुलाच्या कपाळावर बंदूक रोखली अन्...

Next

आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात गुन्हेगारांचा कहर थांबण्याचं नाव घेत नाही आहे. सोमवारी सायंकाळी एका व्यावसायिकाच्या घरावर सशस्त्र हल्लेखोरांनी धक्कादायक घटना घडवली. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या पत्नीच्या तोंडाला टेप बांधून, हात-पाय बांधून, मुलाच्या कपाळावर पिस्तुलीचा धाक दाखवून घरातून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 12 लाखांचा ऐवज लुटून नेला. ही खळबळजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटवली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलानगर पोलीस ठाण्यातील भगवान नगरमध्ये सुशील अग्रवाल यांचे कुटुंबीय राहतात. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन सशस्त्र हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले. त्यावेळी सुनील अग्रवाल यांची पत्नी घरी एकटीच होती. चोरट्यांनी सुनील अग्रवाल यांच्या पत्नीच्या तोंडाला टेप लावून तिचे हातपाय बांधले. काही वेळातच सुनील अग्रवाल यांचा मुलगा क्रिश घरी आला. चोरट्यांनी क्रिशच्या कपाळावर पिस्तूल लावून घरात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत भरून नेले. यानंतर सुनील अग्रवाल यांची मुलगीही घरात घुसली, मात्र तिला धक्काबुक्की करून चोरटे तेथून पळून गेले.

स्थानिक रहिवासी गौरव गुप्ता यांनी सांगितले की, आवाज ऐकून ते घरातून बाहेर आले, तेव्हा त्यांनी चोरट्यांना पळताना पाहिले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी पिस्तूल काढून गोळीबार केला. लोकांनी घाबरून माघार घेतली आणि चोरटे छतावरून घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची संख्या दोन असल्याचे सांगण्यात येत आहे. 12 लाखांचा ऐवज लंपास केल्याचं घरच्यांनी सांगितला आहे.

घटना cctv मध्ये कैद
चोरट्यांची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गुन्हा केल्यानंतर चोरटे रस्त्यावर धावताना दिसतात. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच एसपी सिटी विकास कुमार यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटवली जात आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. लवकरच हे चोरटे पोलिसांच्या हाती लागतील.

Web Title: Tied wife's hands and feet with tape over her mouth and stopped the gun on the child's forehead.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.