टिळक नगर आग प्रकरण : 18 लाखांसाठी गेला पाच जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:53 PM2019-01-08T14:53:23+5:302019-01-08T14:57:44+5:30
याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ), 336, 427 व 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - टिळक नगर येथील सरगम सोसायटीच्या 11 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तपासात इमारतीतील रिफ्युजी परिसर 18 लाख रुपयांना विकण्यात आल्याची माहिती उघड झाल्याचे सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ), 336, 427 व 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आग लागलेली इमारत मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे भागीदार हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांना 2006 मध्ये पुनर्विकासासाठी दिली होती. 2014 साली या फ्लॅटचा ताबा फ्लॅटधारकांना मिळाला. मात्र, या इमारतीत अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नव्हती. तसेच नियमानुसार 15 माळ्यावरील रिफ्युजी परिसरामध्ये भिंत घालून बी व सी विंग यांना जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार याप्रकरणी सरगम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव विवेकानंद वायगंणकर यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. इमारतीस भोगवटा व अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र नसतानाही रहिवाश्यांना राहण्यास भाग पाडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तपासादरम्यान 15 मजल्यावरील 665 चौ. फुटांचा रिफ्युजी परिसर 18 लाख रुपयांना विकण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्या भागात टेरेस करण्यात आला आहे. दरम्यान, खरेदी करणाऱ्या व्यक्तीला तो रेफ्युजी परिसरत असल्याचे माहिती नसल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे पोलीस याबाबत अधिक पुरावे गोळा करत आहेत.
टिळक नगर आगप्रकरण : विकासकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल