Tillu Tajpuriya Murder: पोलिसांसमोरच मेलेल्या टिल्लू ताजपुरियाला पुन्हा भोसकलं; आणखी एक CCTV समोर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 05:32 PM2023-05-05T17:32:54+5:302023-05-05T17:33:51+5:30
Tillu Tajpuriya Murder CCTV Video: 2 मे रोजी टिल्लू ताजपुरियाची 90-100 वार करुन हत्या करण्यात आली.
Tillu Tajpuriya Murder CCTV Footage:दिल्लीतील तिहार तुरुंगात मंगळवारी (2 मे) कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया याची 7-8 जणांनी निर्घृण हत्या केली होती. त्याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्यात ताजपुरियावर धारदार शस्त्राने 90-100 वार केल्याचे दिसत आहे. आता घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यात चक्क पोलिसांसमोर मेलेल्या ताजपुरियावर दोघेजण चाकूने वार करताना दिसत आहेत.
तिहार जेलच्या सेंट्रल गॅलरीत ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तुरुंग कर्मचारी टिल्लू ताजपुरियाचा मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीत दोघे हल्लोखोर येतात आणि मेलेल्या ताजपुरियाच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार करतात. यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेते. यावरुन पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे.
#WATCH | Delhi | A second CCTV video emerges from Tihar Jail's Central Gallery wherein a few people can be seen bringing gangster Tillu Tajpuriya's body out. The visuals later show two other people stabbing the body and hitting it in the presence of Police personnel. pic.twitter.com/FyE09M95C7
— ANI (@ANI) May 5, 2023
गुरुवारी (4 मे) समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक टिल्लू ताजपुरिया याच्यावर चाकूने वार करताना दिसत होते. व्हिडिओ इतका भीषण आहे की, आम्ही तो ब्लर करुन दाखवण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेत दीपक उर्फ तीतर, योगेश उर्फ टुंडा, राजेश आणि रियाझ खान या हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2021 मध्ये रोहिणी कोर्टात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत टिल्लू ताजपुरिया आरोपी होता, ज्यामध्ये गँगस्टर जितेंद्र गोगी मारला गेला होता. गोगीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच टिल्लूची हत्या झाल्याची माहिती आहे. तिहारमध्ये हल्लेखोरांनी अतिसुरक्षा असलेल्या वॉर्डच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी सळ्या कापून टिल्लूच्या वॉर्डमध्ये प्रवेश केला. यानंतर सकाळी 6.15 वाजता ताजपुरियावर सपासप वार केले.