असंवेदनशीलतेचा कळस! बेशुद्ध महिलेसोबत पादचारी सेल्फी काढण्यात मग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 03:52 PM2017-10-30T15:52:43+5:302017-10-30T16:27:25+5:30

ज्या महिलेला ताबडतोब मदतीची गरज होती , तिच्यासोबत सेल्फी घेणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटलं.

The tip of insensitivity! Stuck with unconscious woman to remove pedestrians | असंवेदनशीलतेचा कळस! बेशुद्ध महिलेसोबत पादचारी सेल्फी काढण्यात मग्न

असंवेदनशीलतेचा कळस! बेशुद्ध महिलेसोबत पादचारी सेल्फी काढण्यात मग्न

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला बेशुध्दावस्थेत तशीच तिथे पडून होती. लोक आसपास वावरत होते.पेंसिलवानियामधील पिट्सबर्ग शहरातील एका  इसमाने एका महिलेला मारहाण केली. या मारहाणीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. भारत असो वा इतर देश अश्या घटनांचं प्रमाण आता फार वाढतंय.

पिट्सबर्ग- तंत्रज्ञानाच्या युगात आपण किती असंवेदनशील होत आहोत याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येकवेळी येतच असतो. असाच एक प्रकार यु.एस.मध्ये एका रस्त्यावर घडला. बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका महिलेला मदत करण्याचं सोडून पादचाऱ्यांनी तिचे फोटो काढण्यातच धन्यता मानली. 

एक बेसावध महिला समोरून जात असताना एका विकृताने त्या महिलेच्या कानशिलात लगावली. ही थापड  एवढी जबरदस्त होती की ती महिला खाली कोसळून बेशुद्ध झाली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा तेथे अनेक पादचारी उपस्थित होते. मात्र पादचाऱ्यांनी तर असंवेदनशीलतेचा कळसच गाठला. त्या विकृताला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यापेक्षा आणि बेशुद्ध महिलेला मदत करण्यापेक्षा उपस्थित त्या घटनेचे फोटो काढण्यात मग्न होते. ज्या रस्त्यावर हा प्रकार झाला तिथे वर्दळ नव्हती असंही नाही. तिथून अनेक पादचारी येत-जात होते, मात्र कोणीही थोडीशी माणूसकी दाखविली नाही. यावरही कहर म्हणजे तेथील एका पादचाऱ्याने त्या महिलेचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. हा सारा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखाच आहे. एका लहान मुलाने त्या महिलेच्या बाजूला बसून सेल्फीही काढला. सदर घटना सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाली आहे. 

व्हिडीयो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा पीडितेच्या आईने पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. त्या म्हणतात की,‘मी एखाद्या जनांवरासोबतही असं वागू शकत नाही. कोणी असं असहाय्य पडलेलं असेल तर आम्ही लगेच मदत करतो. पण माझ्या मुलीला गरज असताना कोणीच तेथे गेलं नाही, मात्र कोणी सेल्फी काढायला विसरलं नाही.’ 

ही झाली पिट्सबर्गमधील घटना. भारतातही तर अश्या घटना कायम होत असतात. कोणतीही लहान-मोठी घटना असो, तिकडे मेलेल्याच्या टाळूवरच्ं लोणी खायला लोकं तयार असतात. कोणाची निकड एखाद्याला आपला फायदा करून घेण्याची संधी वाटते. कदाचित इथेच माणुसकी कमी होत असल्याचं दिसून येतं.

सौजन्य - www.mirror.co.uk

Web Title: The tip of insensitivity! Stuck with unconscious woman to remove pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.