‘टिप्पर’ टोळीचा सुत्रधार मध्यवर्ती कारागृहात फोडणार खडी; चाकणमधून बांधल्या मुसक्या 

By अझहर शेख | Published: August 27, 2023 11:19 PM2023-08-27T23:19:51+5:302023-08-27T23:20:12+5:30

अंबड येथे सोशल मीडियावरील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओचा राग मनात धरून ओम्या खटकी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भर चौकात संदीप आठवले याचा वचपा काढला.

'Tipper' gang leader to break stones in Central Jail; Mushki made from chakan | ‘टिप्पर’ टोळीचा सुत्रधार मध्यवर्ती कारागृहात फोडणार खडी; चाकणमधून बांधल्या मुसक्या 

‘टिप्पर’ टोळीचा सुत्रधार मध्यवर्ती कारागृहात फोडणार खडी; चाकणमधून बांधल्या मुसक्या 

googlenewsNext

नाशिक : सिडकोतील ‘टिप्पर’ गँगचा सुत्रधार गौरव उमेश पाटील (२३,रा.वृंदावननगर, अंबड) याच्या अखेर पोलिसांनी पुण्याच्या चाकणमधून मुसक्या बांधल्या. याचा मुळ हस्तक ओम्या खटकी उर्फ ओमप्रकाश पवार याने गुरूवारी (दि.२४) जुन्या सिडकोत संदीप आठवले याचा खून केल्याची घटना समोर आली होती. ओम्या खटकी हा या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या घटनेनंतर त्याचा ‘बॉस’ गौरव पाटील याने नाशिकमधून धूम ठोकली होती. अंबड पोलिसांचे गुन्हे शोध पथक त्याच्या मागावर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुण्याच्या चाकणमधून पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.

अंबड येथे सोशल मीडियावरील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओचा राग मनात धरून ओम्या खटकी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भर चौकात संदीप आठवले याचा वचपा काढला. यानंतर पोलिसांनी संशयित ओम्यासह सहा संशियत साथीदारांना बेड्या ठोकल्या. यानंतर त्यांचा प्रमुख सुत्रधार गौरव पाटील याचा पोलिस शोध घेत असतानाच तो नाशिकमधून निसटला होता. पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे आलेला प्रस्तावानुसार कारवाई करत त्यांनी त्यास झाेपडपट्टी गुंड व अत्यावश्यक वस्तूंच्या काळाबाजारास प्रतिबंध कायद्यान्वये मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे फर्मान सोडले. यानंतर अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे उपनिरिक्षक संदीप पवार, जनार्दन ढाकणे, समाधान चव्हाण यांना त्याच्याविषयीची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांना याबाबत कळवून तत्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाले. या पथकाने चाकणमधील नानेकरवाडीत सापळा रचला. तेथे माेठ्या शिताफीने सराईत गुन्हेगार गौरव पाटील यास ताब्यात घेत नाशिक गाठले. संशयित सराईत गुन्हेगार याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मोठ्या गंभीर गुन्ह्यात सहभाग

दरोड्याची तयारी करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगून धमकावणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत सराईत गौरव पाटील हा सहभागी होता, असे पोलिसांनी सांगितले. तसेच संशयित सराईत व टिप्परचा म्होरक्या गण्या कावळे कारागृहात गेल्यानंतर टिप्पर गँगला लहान-मोठ्या गुन्ह्यांद्वारे सक्रीय ठेवण्यासाठी काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरून त्यांना ‘रसद’चा पुरवठाही पाटील हा करत होता, असेही पोलिसांनी

Web Title: 'Tipper' gang leader to break stones in Central Jail; Mushki made from chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.