वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून 'तिने' घेतला बदला; रेपिस्टला जागीच संपवला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 11:45 PM2022-06-07T23:45:34+5:302022-06-07T23:46:27+5:30

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही.

Tired of repeated rapes, she took revenge; Girl killed rapist at rajasthan | वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून 'तिने' घेतला बदला; रेपिस्टला जागीच संपवला 

वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून 'तिने' घेतला बदला; रेपिस्टला जागीच संपवला 

Next

अलवर - राजस्थानच्या अलवरमध्ये माजी सरपंचाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा २० दिवसांनी पोलिसांनी समोर आणला आहे. या प्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. वारंवार होणारं शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने दुपट्ट्याने आणि तारेने गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येवेळी मृत युवक नशेत असल्याचंही तपासात उघड झाले आहे. 

अतिरिक्त एसपी अतुल साहू यांनी सांगितले की, १७ मे रोजी कोटकसिम भागातील खानपूर गावात माजी सरपंच धनीराम यादव यांचा मुलगा विक्रम उर्फ ​​लाला याची हत्या करण्यात आली होती. खून केल्यानंतर मृतदेह गावाजवळील शेतात रस्त्याच्या कडेला फेकून दिला. सुरुवातीला हत्येचा उलगडा लवकरच होईल, असे वाटत होते, मात्र घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनले. 
पोलिसांनी कसून तपास केला असता खुनाचे रहस्य उलगडले. विक्रमच्या हत्येच्या आरोपावरून गावातील अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता पोलीसही चक्रावून गेले. तिचे एका मुलासोबत संबंध असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. एके दिवशी दोन मुलांनी तिला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी विक्रमलाही कळले आणि याच गोष्टीचा फायदा घेत त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही. दरम्यान, विक्रम तिला सतत त्रास देत होता. अशा स्थितीत अल्पवयीन मुलीने विक्रमला मारण्याचा कट रचला. १७ मे रोजी रात्री अल्पवयीन मुलाने विक्रमला आपल्या घरी बोलावले. त्याने दारूच्या नशेत घर गाठले. घरातून अल्पवयीन मुलीने त्याला जवळच्या शेतात नेले आणि दुपट्ट्याने त्याचा गळा आवळून खून केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घरी आल्यानंतर ती झोपी गेली. सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोलिस अधिकारी महावीर सिंह शेखावत यांनी सांगितले की, वारंवार शारीरिक अत्याचारामुळे त्रासून अल्पवयीन मुलीने विक्रमचा गळा दाबून खून केला. विक्रम मुलीवर शारीरिक अत्याचार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. १७ मेच्या रात्रीही तो दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या वाईट हेतूने गेला. अखेर नाराज होऊन अल्पवयीन मुलीने त्याचा जीव घेतला. यासोबतच घटनास्थळावरून पुरावेही मिटवण्यात आले. मात्र, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीची नारी निकेतन येथे रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डझनभर लोकांची चौकशी केली आहे.

Web Title: Tired of repeated rapes, she took revenge; Girl killed rapist at rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.