बापरे! TMC नेत्याकडे सापडलं तब्बल 11 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:14 PM2023-01-12T18:14:14+5:302023-01-12T18:22:25+5:30
TMC Zakir Hussain : पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षण घोटाळ्यानंतर टीएमसी आता पुन्हा वादात सापडली आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात धक्कादायक घटना समोर आली आहे. पुन्हा एकदा कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षण घोटाळ्यानंतर टीएमसी आता पुन्हा वादात सापडली आहे. मुर्शिदाबादमधील टीएमसी आमदार झाकीर हुसैन यांच्या घरातून 10.90 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाने बुधवारी रात्री झाकीर हुसैन यांच्या घरावर आणि त्याच्या अनेक कारखान्यांवर छापे टाकले. त्या छाप्यातच कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे.
रोख रकमेशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार करत आहेत, परंतु एजन्सींनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एकूण 28 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. झाकीर आमदार असलेल्या मुर्शिदाबादमधूनही 11 कोटी रुपये मिळाले आहेत. टीएमसी आमदाराचा बिडीचा मोठा व्यवसाय आहे, अनेक कारखाने आहेत, त्या कारखान्यांवर अधिकारी लक्ष ठेवून होते, त्यामुळे तपासादरम्यान तेथेही छापे टाकण्यात आले आहेत.
झाकीर यांची रघुनाथगंजमध्ये राईस मिल आहे, तिथेही छापा टाकण्यात आला आहे. टीएमसी आमदाराच्या एका जवळच्या मित्राच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. आता या तपासाचेही काही फोटो समोर आले आहे. त्या फोटोमध्ये नोटांचा डोंगर दिसत आहे. टेबलावरच नोटांचे पाच मजले उभारण्यात आले आहेत. आता आयकर विभागाच्या या तपासावर टीएमसीचे आमदार झाकीर हुसैन यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या बाजूनेही पूर्ण सहकार्य मिळाले आहे. त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेची सर्व कागदपत्रे त्याच्याकडे असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
झाकीर वेळोवेळी कर जमा करतात, त्यामुळे त्यांना कशाचीही भीती वाटत नाही असं म्हटलं आहे. त्याचवेळी टीएमसी नेते कुणाल घोष यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. झाकीर हुसैन यांचा टीएमसीमध्ये येण्यापूर्वीच बिडीचा मोठा व्यवसाय होता, असे त्यांनी सांगितले आहे. हा व्यवसायाचा प्रकार आहे, जेथे अधिक रोख आवश्यक आहे कारण मजुरांना पैसे द्यावे लागतात. त्यात तफावत आढळल्यास तपास यंत्रणा कारवाई करेल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"