उल्हासनगरात 4 लाखांचा तंबाखू पान मसाला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 06:38 PM2019-04-12T18:38:01+5:302019-04-12T18:40:47+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर - शहरातील चोपडा कोर्ट परिसरातील एका दुकानात तब्बल 4 लाख किमतीचा विमल पान मसाला व तंबाखू पॉकेट अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-4 चोपडा कोर्ट परिसरातील एका दुकानात तंबाखूजन्य विमल पान मसाला विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग ठाणे यांना मिळाली होती. त्यानुसार विभागाचे आयुक्त इंद्रजीत चिलवंते यांच्या पथकाने 11 एप्रिल रोजी धाड टाकून विक्रीस प्रतिबंध असलेला 3 लाख 96 हजाराचा विमल पान मसाला पॉकेट व 44 हजाराचे तंबाखू पॉकेट असे एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी महेंद्र सोमय्या यांना अटक केली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरात यापूर्वी असा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहे.