सहनशीलतेचा अंत झाला; कुटुंबाला त्रास देणाऱ्या मद्यधुंद पित्याचा मुलाने खून केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:21 PM2020-05-27T16:21:02+5:302020-05-27T16:26:00+5:30

राग अनावर झाल्याने धारदार चाकूने भोसकून वडिलांचा गळा चिरला

Tolerance ended; The son murdered the abusive drunken father | सहनशीलतेचा अंत झाला; कुटुंबाला त्रास देणाऱ्या मद्यधुंद पित्याचा मुलाने खून केला

सहनशीलतेचा अंत झाला; कुटुंबाला त्रास देणाऱ्या मद्यधुंद पित्याचा मुलाने खून केला

Next
ठळक मुद्देबिलोली तालुक्यातील अटकळी येथील घटना

बिलोली (जि़नांदेड) : तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटकळी येथे मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या पित्याचा पोटच्या मुलाने धारदार शस्त्राने भोसकून खून केला. हि घटना २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. रामतीर्थ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दारुसाठी घरातील सर्व सदस्यांना नेहमी मानसिक आणि शारीरिक त्रास देणाऱ्या मयत मारुती पिराजी रघुपती (वय ४०) याने नेहमीप्रमाणे दारू पिऊन २६ मे रोजी सायंकाळी घरी मुलाशी व पत्नीशी वाद घातला. यावेळी मारुती रघुपती यांची बहीणही त्या ठिकाणी होती. आत्याच्या देखतच वडील अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याने मयताचा मुलगा भूजाजी पिराजी रघुपती (वय २०) याचा राग अनावर झाल्याने धारदार चाकूने भोसकून वडिलांचा गळा चिरला.

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या वडीलांचा काही क्षणातच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मयत मारुतीची पत्नी तथा आरोपीची आई पारूबाई मारुती रघुपती यांनी रामतीर्थ पोलिस ठाण्याला दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे  सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.  फिर्यादीअंती सपोनी सोमनाथ शिंदे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वेय गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  बिट जमादार पवार तपास करीत आहेत.

Web Title: Tolerance ended; The son murdered the abusive drunken father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.