खूप कंटाळलो आहे! बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल, WhatsAppवर पाठवली सुसाईड नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:49 PM2022-03-05T18:49:33+5:302022-03-05T18:50:19+5:30
Suicide Case : देव त्यागी आणि राजेश जाट यांनीही बोलावून मला मारहाण केली. त्यांच्यामुळेच आता मी माझा जीव देत आहे. माझ्या मृत्यूला तीन पुरुष जबाबदार असून मला न्याय द्यावा, मला तीन मुली आहेत. ज्वाला शर्माला कंटाळून मी माझा जीव देत आहे, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे.
पानिपत - हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील एका हेड कॉन्स्टेबलने (EHC) आत्महत्या केली आहे. पोलिसाने पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 6 च्या मागे रेल्वे रुळावर ट्रेनसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. रेल्वे ट्रॅकवर मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती जीआरपीला मिळाली. मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे जीआरपीने मृतदेहाची ओळख पटवली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलिसाने आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली याचा जीआरपी तपास करत आहे.
खरं तर, जानेवारी 2022 मध्ये एका महिलेने पोलिसाविरुद्ध बलात्काराचा आरोप करत केस दाखल केली होती. प्रकरणाची नोंद झाल्यानंतर, पोलिसाला एसपींनी हजर राहण्यास सांगितले. तेव्हापासून हे प्रकरण पोलिस ठाण्यात प्रलंबित आहे. या प्रकरणात, पोलिसासोबत, त्याच्या भावावर देखील IPC च्या कलम 323, 34, 376 (2) (N), 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भावोजीने मेव्हणीला १०० फूट खोल विहिरीत ढकललं; ३६ तास साप-विंचवांच्या विळख्यात होती तरुणी
दादा, मला वाचव, 'तो' बंदूक घेऊन मागे फिरतोय अन् काही वेळातच आढळला वंशिकाचा मृतदेह
हे भयंकर पाऊल उचलण्यापूर्वी, पोलीस संदीप कुमार यांनी WhatsAppवर मेसेजद्वारे त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीला सुसाईड नोट पाठवली. यासोबतच त्यांनी स्वत:चा रेल्वे ट्रॅकवर उभा असलेला फोटोही पाठवला आहे. त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, आज ज्वाला (काल्पनिक नाव) हिने मला WhatsAppवर फोन करून घरी बोलावून मारहाण केली. त्यानंतर देव त्यागी आणि राजेश जाट यांनीही बोलावून मला मारहाण केली. त्यांच्यामुळेच आता मी माझा जीव देत आहे. माझ्या मृत्यूला तीन पुरुष जबाबदार असून मला न्याय द्यावा, मला तीन मुली आहेत. ज्वाला शर्माला कंटाळून मी माझा जीव देत आहे, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे.
तीन मोबाईलवर आत्महत्येचा मेसेज पाठवला
संदीपने राजेश जाट आणि देव त्यागी यांचे मोबाईल नंबर पाठवताना मेसेज लिहिला की, ज्वाला शर्माला खूप कंटाळलो आहे, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्यासोबत या तिघांनी मिळून खूप वाईट गोष्टी केल्या, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पानिपत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या मित्रांनी पोलिस प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. तसेच मृत संदीपला तीन मुली असल्याचे सांगितले. त्यांच्या जाण्याने मुलींच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावले असून पत्नी अस्वस्थ झाली आहे. मात्र, कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.