टॉप्स ग्रुपचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 02:17 AM2020-11-30T02:17:50+5:302020-11-30T02:18:02+5:30

आर्थिक व्यवहाराचा हिशेब ठेवणाऱ्या प्रगती विकास रणदिवे यांच्यासह अटकेत असलेल्या अमित चांडोळेचा जबाब नोंदविला.

Tops Group's financial malpractice case continues to probe suspects | टॉप्स ग्रुपचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू

टॉप्स ग्रुपचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू

Next

मुंबई : टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकड़ून (ईडी) संशयितांकडे चौकशी सुरू आहे. टॉप्स ग्रुपच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून याबाबत जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी टॉप्स ग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्यूशन लिमिटेड, इंडिया आणि संस्थापक अध्यक्ष राहुल रणधीर नंदा, रणधीर नंदा, सुनीता नंदा, राषी नंदा, रनीता नंदा, आयुष पसरी, एम शशिधरन यांच्याविरुद्ध कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी रमेश अय्यर आणि अमर पनघल यांनी आरोप केले. त्यानुसार, ईडीने दाखल गुन्ह्यांत अय्यर, पनघल यांच्यासह कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बिजलानी, आर्थिक व्यवहाराचा हिशेब ठेवणाऱ्या प्रगती विकास रणदिवे यांच्यासह अटकेत असलेल्या अमित चांडोळेचा जबाब नोंदविला.

गुंतवणूकदार संस्था ईडीच्या रडारवर
अन्य कर्मचारी, संबंधित संशयितांकडे पथक अधिक तपास करत आहे. हिशेबाची नोंदवही, जप्त कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमित चांडोळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित चांडोळे याला रविवारी ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या  चाैकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक अधिक तपास करत आहे.
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित चांडोळे याला रविवारी ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या  चाैकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक अधिक तपास करत आहे.

Web Title: Tops Group's financial malpractice case continues to probe suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.