पर्यटकच निघाला चोर : चोरी प्रकरणात मुंबईतील तरुण गोव्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 09:41 PM2019-10-17T21:41:18+5:302019-10-17T21:42:36+5:30

संशयिताकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Tourist from mumbai arrested in two wheeller theft at goa | पर्यटकच निघाला चोर : चोरी प्रकरणात मुंबईतील तरुण गोव्यात जेरबंद

पर्यटकच निघाला चोर : चोरी प्रकरणात मुंबईतील तरुण गोव्यात जेरबंद

Next
ठळक मुद्देदुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी आदिल मोहम्मद या युवकाच्या मुसक्या आज आवळल्या.फातोर्डा पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेउन चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी चोरली होती हे उघड झाले.

मडगाव - पर्यटक म्हणून गोव्यात आलेल्या मुंबई येथील एका १९ वर्षीय युवकाने गोव्यात दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. दक्षिण गोव्यातील फातोर्डा या पोलीस ठाण्याच्या हददीतून चोरीला गेलेल्या एका दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी आदिल मोहम्मद या युवकाच्या मुसक्या आज आवळल्या. तो मूळ मुंबईतील कुर्ला भागातील असून, आपल्या अन्य एका मित्रासमवेत तो गोव्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

संशयिताकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या 379 कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज मांद्रेकर पुढील तपास करीत आहेत. १५ ऑक्टोबर रोजी दुचाकी चोरीची ही घटना घडली होती. येथील वाहतुक खात्याच्या कार्यालयाविरुध्द भागात प्लेझर स्कुटर पार्क करुन ठेवली होती. यासंबधी लिंडा जोएना इ रॉड्रगिस या महिलेने फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती. तक्रारदाराच्या मुलाच्या नावे ही स्कुटर नोंदणीकृत आहे. दुचाकी चोरीची तक्रार पोलिसांत नोंद केल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणाचा तपासकामाला सुरुवात केली. आदिलने या स्कुटरची क्रमांकपटटी काढून टाकली होती. काही दिवसांपुर्वी तो आपल्या अन्य एका मित्रासमवेत गोव्यात फिरायला आला होता. चोरीची दुचाकी घेउन तो शेजारच्या कर्नाटकातही गेला होता. विनाक्रमांक दुचाकी घेउन फिरत असताना, फातोर्डा पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेउन चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी चोरली होती हे उघड झाले. पुढील पोलीस तपास चालू आहे.

Web Title: Tourist from mumbai arrested in two wheeller theft at goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.