भयंकर! ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाला पाठलाग करून बेदम मारलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:08 IST2023-07-18T17:00:21+5:302023-07-18T17:08:42+5:30
एका छोट्याशा चुकीसाठी पाठलाग करून पर्यटकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी एका दुकानात शिरला. मात्र आरोपी तेथेही पोहोचले.

भयंकर! ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाला पाठलाग करून बेदम मारलं; नेमकं काय घडलं?
आग्राचे लोक अतिउत्साहाने पाहुण्यांचे स्वागत करतात, पण दिल्लीहून येथे आलेल्या एका पर्यटकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका छोट्याशा चुकीसाठी पाठलाग करून पर्यटकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी एका दुकानात शिरला. मात्र आरोपी तेथेही पोहोचले. त्याला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण ताजगंज परिसरातील बसई चौकीचे आहे. दिल्लीतील एक पर्यटक कारने ताजमहालला भेट देण्यासाठी आला होता. तर दुसरीकडे भाविकांची परिक्रमा सुरू होती. परिक्रमा करणाऱ्या एका व्यक्तीला गाडी स्पर्श करून गेली. यानंतर इतर लोक संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
संतप्त झालेल्या लोकांनी पर्यटकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पर्यटक आपल्या चुकीबद्दल माफी मागत राहिला पण त्याचं ऐकून घेतलं नाही. जीव वाचवण्यासाठी तो दुकानात घुसला. लोक लाठ्या-काठ्या घेऊन तेथे पोहोचले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.